Skip to content

सस्नेह नमस्कार,

डिसेंबर २०२० मध्ये नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय प्राप्त करणे, हे माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय अनुभव आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर, भाजपाच्या किंवा त्याचप्रकारच्या विचारसरणीच्या उमेदवारांना किंवा पक्षाला या मतदारसंघातून निवडून येण्याची परंपरा होती. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपाच्या किंवा जनसंघाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी केले होते. मात्र, या परंपरेला भेद देऊन, काँग्रेस महाविकास आघाडीच्या घडणीखाली मी निवडून येणे हे आपल्या सर्व मतदारांचे, कार्यकर्त्यांचे आणि नेतृत्वाचे अथक परिश्रमाचे फलित आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या आमदार म्हणून, मी विविध प्रकारच्या समस्यांचा सामना केला आणि त्यावर योग्य उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला. शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागातील शिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचे उशिराने होणारे पगार, दीर्घकाळ प्रलंबित असलेली वैद्यकीय देयकं, वरिष्ठ श्रेणीच्या पदोन्नतीसंबंधी प्रलंबित प्रकरणं, राज्यातील हजारो शाळांना विना अनुदान असलेल्या स्थितीतून अनुदान प्राप्त करण्याचे प्रयत्न, अशासकीय सार्वजनिक ग्रंथालयांना रखडलेले अनुदान मिळवून देणे आणि त्यामध्ये वाढ करणे, या वाचनालयांचा थांबलेला दर्जा पुन्हा सुधारण्याचे कार्य, ग्रामीण व शहरी शाळांचे डिजिटायझेशन आणि नूतनीकरण, तसेच डॉक्टर्स, इंजिनिअर्स, चार्टर्ड अकाउंटन्ट्स, व्यावसायिक पदवीधारक, सामान्य पदवीधारक, अंशकालीन पदवीधारक यासारख्या विविध गटांच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. विशेषतः, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पदवीधर भवन सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ऑगस्ट २०२३ मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली, यानिमित्ताने राज्य सरकारकडून १०० कोटी रुपयांचा विशेष निधी मिळविण्याची मागणी केली. त्यावर तत्कालीन अर्थमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांनी १०७ कोटी रुपयांची मंजुरी दिली, याचा मला अत्यंत आनंद आहे.

आपला विश्वास आणि समर्थन कायम राहो, यासाठी मी सदैव कृतज्ञ राहील.

अभिजित गोविंदराव वंजारी
आमदार, पदवीधर मतदारसंघ, नागपूर विभाग
मुख्य प्रवक्ते – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, विधान परिषद

फेसबुक