आमदार अभिजित वंजारींचा सरकारला सवाल
महानगरपालिका अधिनियम लागू असूनही कारवाई का नाही?
मुंबई : 2025 च्या पावसाळी अधिवेशनात नागपूरचे आमदार अभिजित वंजारी यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या तरतुदींनुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या मुद्द्यावर सरकारला जाब विचारला. अधिनियमाच्या कलम 260(1)(a) आणि (2) नुसार महापालिका प्रशासनाने अतिक्रमण केलेल्या बांधकामांवर तातडीने कारवाई करणे बंधनकारक असताना, मंत्री महोदयांच्या उत्तरात अनाठायी विलंब दिसतो, अशी टीका वंजारी यांनी केली. वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला की, “ज्या दुकानदारांना कलम 260 अंतर्गत आधीच नोटीसी दिल्या आहेत आणि त्या नोटिसींना 15 दिवस उलटून गेले आहेत, अशा प्रकरणांमध्ये महानगरपालिका त्वरित अतिक्रमण हटवण्याची कारवाई करणार का?” या मुद्द्यावर सरकारने ठोस भूमिका घेऊन स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी अधिवेशनात केली.