आमदार अभिजित वंजारी आता काँग्रेसचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्षपद
नागपूर : महाराष्ट्रातील काँग्रेस संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्यातील वरिष्ठ उपाध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नियुक्ती केली आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांची वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे.
याप्रसंगी आपल्या कार्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आमदार अभिजित वंजारी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव के.सी. वेणुगोपाल तसेच प्रदेशाध्यक्षांचे आभार मानले आहेत. नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.
काँग्रेसचे खजिनदार म्हणून अभय छाजेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ उपाध्यक्षांमध्ये ॲड. गणेश पाटील, डॉ. प्रज्ञा राजीव सातव, डॉ. सुनील देशमुख, डॉ. वजाहत मिर्झा, अनीस अहमद, गोपाल अग्रवाल, कल्याण काले, मोहन जोशी, मुजफ्फर हुसेन, नाना गावंडे, राजेंद्र मुलक, रमेश बागवे, रणजित कांबळे, सचिन नाईक आणि तुकाराम रेंगे पाटील यांचा समावेश आहे.
उपाध्यक्षपदावर अनिल पटेल, अशोक धवड, अशोक गर्ग, अशोक निलंगेकर, ॲड. आसीफ शौकत कुरेशी, बी. आय. नागराले, बाळासाहेब शंकरराव देशमुख, बलदेव महाराज राठोड, हरीश भैय्या पवार, हिदायत पटेल आणि कल्याण डाले यांची नियुक्ती झाली आहे.
या नव्या निवडीतून महाराष्ट्रातील काँग्रेस संघटन अधिक गतिमान व प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.