Skip to content

Abhijit Wanjari Office

आमदार अभिजित वंजारी चंद्रपूर जिल्ह्याचे निरीक्षक

चंद्रपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांची काँग्रेसच्या चंद्रपूर शहर व ग्रामीण जिल्हा निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतेच त्यांच्या नियुक्तीचे पत्र जारी… Read More »आमदार अभिजित वंजारी चंद्रपूर जिल्ह्याचे निरीक्षक

रोजगार मेळावा म्हणजे तरुणाईसाठी संधीचे दालन

– आमदार अभिजित वंजारी यांचे प्रतिपादन – 663  पदवीधरांना मिळाले ‘ऑफर लेटर’   चंद्रपूर : कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची अनेक क्षेत्रात आवश्यकता आहे. मात्र, कंपन्या योग्य व्यक्तीपर्यंत अथवा संबंधित व्यक्ती कंपन्यांपर्यंत… Read More »रोजगार मेळावा म्हणजे तरुणाईसाठी संधीचे दालन

खुशखबर!! Job Fair for Graduates | थेट मुलाखत, थेट नोकरी

खुशखबर!! 28 मार्चला भव्य रोजगार मेळावा आयोजित ! https://news24.mahabharti.in/mega-job-fair-on-march-28/   पदवीधर बेरोजगार उमेदवारांसाठी 27,28,29 मार्चला रोजगार मेळावे आयोजित! | Gadchiroli Job Fair 2025 https://mahabharti.in/gadchiroli-job-fair-2025 ————— पदवीधर बेरोजगारांसाठी वर्धेत 27 मार्चला… Read More »खुशखबर!! Job Fair for Graduates | थेट मुलाखत, थेट नोकरी

Job fair for unemployed graduates

पदवीधर बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा

गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे आयोजन : महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांचा सहभाग नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रातील सुमारे 40 नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात… Read More »पदवीधर बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा

Wardha Job Fairs 2025 : पदवीधर बेरोजगारांसाठी वर्धेत 27 मार्चला रोजगार मेळावा

गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे आयोजन  वर्धा(wardha) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगारांसाठी गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने 27 मार्चला सकाळी 10 ते 6 या वेळेत येथील हुतात्मा स्मारकासमोरील चरखा गृह (भवन) येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. : महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांचा सहभाग नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रातील सुमारे 40 नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार असून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना त्याच ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. सदर रोजगार मेळाव्यात वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदवीधर बेरोजगार सहभागी होऊ शकतील. तत्पूर्वी त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. abhijitwanjari.com या वेबसाईटवर जाऊन ही नोंदणी करता येईल. नोंदणी झालेल्या उमेदवारांनी 27 मार्च रोजी नियोजित ठिकाणी शैक्षणिक पात्रतेचे सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहणे बंधनकारक आहे. संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित कंपनीना देण्यात आलेल्या क्रमांकाचे टोकण उमेदवारांना देण्यात येईल. त्यानुसार, संबंधित क्रमांकाच्या दालनात त्यांची मुलाखत होईल. निवड झालेल्या उमेदवारांना मेळाव्यातच नियुक्तीपत्र देण्यात येईल. या मेळाव्यात जास्तीत जास्त पदवीधर बेरोजगारांनी सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी केले आहे.

Opportunities

Gadchiroli Job Fair 2025 : पदवीधर बेरोजगारांसाठी गडचिरोलीत 28 मार्चला रोजगार मेळावा

गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे आयोजन :  गडचिरोली : विपुल खनिज संपदेने समृद्ध असलेल्या आणि आता स्टील निर्मितीचा जिल्हा म्हणून नावारूपास येणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगारांसाठी गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने 28 मार्चला सकाळी 10 ते 6 या वेळेत येथील महाराजा सेलिब्रेशन हॉल, धानोरा रोड  येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांचा सहभाग नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रातील सुमारे 40 नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार असून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना त्याच ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. सदर रोजगार मेळाव्यात वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदवीधर बेरोजगार सहभागी होऊ शकतील. तत्पूर्वी त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. abhijitwanjari.com या वेबसाईटवर जाऊन ही नोंदणी करता येईल. नोंदणी झालेल्या उमेदवारांनी 28 मार्च रोजी नियोजित ठिकाणी शैक्षणिक पात्रतेचे सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहणे बंधनकारक आहे. संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित कंपनीना देण्यात आलेल्या क्रमांकाचे टोकण उमेदवारांना देण्यात येईल. त्यानुसार, संबंधित क्रमांकाच्या दालनात त्यांची मुलाखत होईल. निवड झालेल्या उमेदवारांना मेळाव्यातच नियुक्तीपत्र देण्यात येईल. या मेळाव्यात जास्तीत जास्त पदवीधर बेरोजगारांनी सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी केले आहे. #रोजगारमेळावा #पदवीधर_तरुणांसाठी_संधी #GovindraoWanjariFoundation #JobFair #chandrapur #CareerOpportunities   Graduates Job Fair in Gadchiroli on March 28- Adv. Abhijit Wanjari’s initiative.