– आमदार अभिजित वंजारी यांचा विधान परिषदेत सवाल
नागपूर : राज्यात लागू करण्यात आलेल्या एनसीईआरटीच्या नियमांबाबत सर्वोच्च न्यायालयात NCERT रिव्ह्यू पिटिशन नेमक्या किती दिवसांत दाखल करण्यात येणार, असा सवाल आमदार अभिजित वंजारी यांनी विधान परिषद सभागृहात उपस्थित केला.
सभागृहात बोलताना वंजारी म्हणाले की, राज्य सरकारने एनसीईआरटीच्या नियमांनुसार निर्णय लागू केल्याचे उत्तर दिले असले, तरी या संदर्भात रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याबाबत सुरुवातीला विधी व न्याय विभागाने सहमती दर्शवली नव्हती. त्यामुळे अनेक सामाजिक व शैक्षणिक संघटनांनी स्वतःच्या स्तरावर सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली.
वंजारी यांनी सांगितले की, खासगी संघटनांकडून रिव्ह्यू पिटिशन दाखल होणे ही बाब वेगळी असली, तरी राज्य सरकारने स्वतः पुढाकार घेऊन हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात मांडल्यास त्याचा अधिक प्रभावीपणे पुनर्विचार होऊ शकतो. त्यामुळे शासनाने या प्रकरणात सक्रिय भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, आता विधी व न्याय विभागाने रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यास संमती दिल्याचे सरकारने सभागृहात सांगितले असल्याचे नमूद करत, नेमक्या किती कालावधीत आणि कोणत्या पद्धतीने ही रिव्ह्यू पिटिशन Supreme Court of India मध्ये दाखल केली जाणार आहे, याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली.
#AbhijitWanjarri #VidhanParishad #NCRT #SupremeCourt #MaharashtraPolitics
