आमदार अभिजित वंजारी यांनी उपस्थित केला मुद्दा
मुंबई/नागपूर : राज्यातील सर्व जिल्ह्यातील कला व क्रीडा शिक्षकांना वरीष्ठ व निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण घेण्यास सांगण्यात आले. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक शिक्षकाकडून 2000 रुपयांची फी आकारण्यात आली. मात्र एवढी फी असूनही प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांसाठी भोजनाची कोणतीही सोय करण्यात आली नव्हती, असा गंभीर आरोप आमदार वंजारी यांनी विधानसभेत केला.
मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात बोलतानाआमदार अभिजित वंजारी यांनी, एका शिक्षकाकडून एवढी रक्कम घेऊनही आवश्यक सुविधा का पुरवण्यात आल्या नाहीत? प्रशिक्षणाच्या नियोजनामध्ये शिक्षकांचा विचार का केला गेला नाही? असे प्रश्न उपस्थित करत धारेवर धरले.