Skip to content

कृष्णा कालवा डागडुजीसाठी तातडीने कार्यवाही करा!

आमदार अभिजित वंजारी यांची विधान परिषदेत मागणी

 

मुंबई/नागपूर : सांगली व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आमदार अभिजित वंजारी यांनी ठाम भूमिका घेतली. कृष्णा कालवा नादुरुस्त झाल्यामुळे हजारो हेक्टर शेतीला पाणीपुरवठा बंद असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, असे त्यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले.

आमदार वंजारी म्हणाले, सांगली व सातारा जिल्ह्यातील शेतजमिनींना सिंचनासाठी महत्त्वाचा असलेला कृष्णा कालवा सध्या नादुरुस्त असून त्याची डागडुजी दीर्घकाळ प्रलंबित आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.

यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करताना त्यांनी पाटबंधारे विभागाने याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे ठणकावून सांगितले.

विधानसभेत उपस्थित मंत्र्यांनी या विषयाची गंभीर दखल घेत तपशीलवार अहवाल मागवण्याचे आश्वासन दिले असून लवकरच कालव्याच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती अधिवेशनाच्या चर्चेत देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *